पु.भा. भावे यांच्या फाळणीवरील कथांचे अभिवाचन पार्ल्यात संपन्न
मुंबई, दि. 23, ऑगस्ट - भाषाप्रभू पु.भा. भावे स्मृती समितीच्या वतीने भाव्यांच्या फाळणीवरील कथांचे आणि लेखांचे अभिवाचन स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र, विलेपार्ले (पूर्व) येथे चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या अध्यक्षतेखाली दमदारपणे करण्यात आले.
ओमप्रकाश शिंदे, संजय पंडित, धनश्री करमरकर, संजीव तांडेल, सुबोध भावे आणि प्रेरणा निगडीकर या तरुण कलाकारांनी भाव्यांच्या ॠघायाळ, ॠप्रायश्चित्त’, ॠअंकुर’ या कथांचे आणि ॠपिशवी आणि परमेश्वर’ या लेखाचे अभिवाचन केले. भारताच्या गेल्या 1 हजार वर्षातील सर्वात आश्चर्यकारक, क्लेशदायक आणि मोठी घटना जी फाळणी तिला शब्दांनी सकारात्मकरित्या सामोरे जाऊन त्यावेळी हिंदू समाजाने विशेषत: स्त्रियांनी काय सोसले याचा चक्षुर्वैसत्यम दस्तावेज भाव्यांनी उपलब्ध करून ठेवला हे त्यांचे साहित्यावरचे आणि समाजावरचे ऋण न विसरता येण्याजोगे आहे, असे समितीचे कार्यवाह अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी सांगितले. भावे साहित्याचे सार, हाडीमासी खिळलेली परिस्थिती शरणता सोडून लोकांनी परिस्थितीशी संघर्ष करावा हा आहे आणि ते त्यांनी प्रेरक भाषेत मांडले आहे. अशाप्रकारे सामान्य माणसाला केंद्रबिंदू समजून संवाद साधण्याची टिळकांची परंपरा पत्रकारितेतच नव्हे, तर ललित साहित्यातही भाव्यांनी निष्ठेने पाळली, असे कुळकर्णी यांनी सांगितले. राजदत्त यांनी प्रत्यक्ष संबंधातून निर्माण झालेल्या भाव्यांच्या आठवणी सांगितल्या.