Breaking News

मैदानावर गैरवर्तणूक केल्याप्रकरणी इंग्लडच्या स्टोक्सला दंडात्मक गुण

हेंडिग्ले, दि. 28, ऑगस्ट - इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने मैदानावर गैरवर्तणूक केल्याप्रकरणी त्याला 1 दंडात्मक गुण (डि-मेरिट पॉईंट) देण्यात आला  आहे. विंडिजविरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्याच्या वेळी विंडिजचा शाय होप फलंदाजी करत होता. त्यावेळी त्याच्या बॅटला घासून चेंडू क्षेत्ररक्षकांच्या मधून  सीमारेषेकडे गेला. त्यावेळी स्टोक्सने चिडून आक्षेपार्ह वक्तव्य केले. ते शब्द यष्टीमध्ये असलेल्या माईकच्या माध्यमातून पंचांसह सामनाधिका-यांनीही ऐकले. त्यामुळे  त्याला 1 दंडात्मक गुण देण्यात आला. त्यामुळे आता स्टोक्सकडे तीन दंडात्मक गुण आहेत. जर त्याला चौथा दंडात्मक गुण मिळाला, तर स्टोक्सला निलंबनाच्या  कारवाईला सामोरे जावे लागेल.