Breaking News

अकमल-आर्थर वादाच्या तपासासाठी त्रिसदस्यीय समितीचे गठन

कराची, दि. 28, ऑगस्ट - पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर आणि फलंदाज उमर अकमल यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या तपासासाठी  पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. संघाच्या कार्यकारी विभागाचे संचालक हरुन रशीद, माध्यम विभागाचे संचालक  अमजद भट्टी आणि मंडळाचे कायदा सल्लागार सलमान नासीर यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
आर्थर यांनी जाणीवपूर्वक उमर अकमलला संघाच्या राष्ट्रीय शिबीरात सराव करू दिला नाही. ड्रेसिंग रूमच्या परिसरात त्याला शिवीगाळ केला. तसेच चॅम्पियन्स  करंडक स्पर्धेच्या वेळी न पटणारी कारणे देऊन अकमलला मायदेशी धाडले आणि तंदुरूस्ती चाचणी देण्यास परवानगी नाकारली, असे आरोप अकमलने आर्थर  यांच्यावर केले आहेत. ड्रेसिंग रूममधील शिवीगाळाबाबतचा साक्षीदार असलेला निवड समितीचा अध्यक्ष इंझमाम उल हक हा सध्या हज यात्रेसाठी गेला आहे. तर  आर्थरदेखील सुटीसाठी परदेशी गेले आहेत. त्यामुळे हे दोघे पाकिस्तानात आल्यावरच समितीच्या तपासाला व चौकशीला गती मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात  येत आहे.