Breaking News

भाजप नेत्याने रूग्णवाहिका थांबवून ठेवल्यामुळे रूग्णाचा मृत्यू; कुटुंबियांचा आरोप

चंदीगड, दि. 08, ऑगस्ट - हरियाणामधील फतेहाबाद येथे भारतीय जनता पक्षाचे नेते दर्शन नागपाल यांनी रूग्णावाहिका थांबवून ठेवल्याने रूग्णाचा मृत्यू झाल्याचा  आरोप रूग्णाच्या कुटुंबियांनी केला आहे. नागपाल यांनी रुग्णवाहिका अर्धा तास थांबवून ठेवल्यामुळे रूग्णाची तब्येत आणखीन बिघडली. रुग्णालयात पोहोचल्यावर  रूग्णाचा मृत्यू झाला. रूग्णाला वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे रूग्णाच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
दरम्यान नागपाल यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. रुग्णवाहिकेने माझ्या वाहनाला धडक दिली होती. मात्र रुग्ण असल्याने रुग्णवाहिका  थांबवली नाही, असे स्पष्टीकरण नागपाल यांनी दिले आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.