Breaking News

ईशान्य भारतात पुराचे थैमान, रेल्वेसेवा 11व्या दिवशीही बंदच

आगरताळा, दि. 23, ऑगस्ट - ईशान्य भारतात पुराने थैमान घातले असून त्यामुळे येथील रेल्वेवाहतूक गेले 11 दिवस बंद आहे. पुरग्रस्तांना खाद्य पदार्थ  व अन्य गरजेच्या वस्तू पुरवण्याच्या कार्यात त्यामुळे अडथळा निर्माण होत आहे.
ईशान्य भारतातील राज्यांप्रमाणेच पश्‍चिम बंगालमधील सात जिल्हे व बिहारमधील पाच जिल्ह्यांमध्ये रेल्वे सेवा पुरवणा-या पूर्वोत्तर फ्रन्टिअर रेल्वे  (एनएफआर) सेवेस पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. एनएफआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रणव ज्योति शर्मा यांनी सांगितले की,  आसाम, बंगालमधील उत्तरेकडील भाग व बिहारमधील उत्तरेकडील हे पूरग्रस्त भाग असून त्यामुळे ईशान्य भारतास उर्वरित भारताशी जोडणारी रेल्वेसेवा 12  ऑगस्टपासून बंद आहे. देशाच्या अन्य भागातून ईशान्य भागाकडे जाणा-या सर्व रेल्वेगाड्या बंगालच्या जलपाईगुडी स्थानक व बिहारच्या कटिहार  स्थानकावरून जातात. मात्र, पुरामुळे बिहारच्या किशनगंज, कटिहार व अररिया जिल्ह्यातील रेल्वेसेवेला जास्त फटका बसला आहे. अभियंत्यांकडून देण्यात  आलेल्या माहितीनुसार 28 ऑगस्ट अगोदर रेल्वे वाहतूक पूर्णपणे सुरू करता येणार नाही. रेल्वेगाड्या रद्द केल्याजात असल्याने रेल्वे प्रशासनाला 550  कोटींचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.