Breaking News

जवान रवींद्र बबन धनावडे जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये शहीद

सातारा, दि. 27, ऑगस्ट - जावली तालुक्यातील मेढा शहरापासून केवळ दिड किलो मीटर अंतरावरील मोहाट गावचे सुपुत्र जवान रवींद्र बबन धनावडे हे  अतिरेक्यांशी लढताना जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये शुक्रवारी रात्री शहीद झाले. त्याच्या बाबतचे हे दु:खद वृत्त आज दुपारी मेढा परिसरात पोहोचताच मेढा  परिसरावर दु: खाची छाया पसरली. 37 वर्षीय रवींद्र हे सन 2000 साली सीआरपीएफ जवान म्हणुन दाखल झाले होते. त्यांचे पश्‍चात विधवा आई श्रीमती  जानकाबाई, पत्नी मेघा, 13 वर्षीय मुलगी श्रध्दा, आठ वर्षाचा वेदांत हा मुलगा तसेच सचिन व किशोर हे दोन भाउ आहेत. 12वी पास झाल्यावर रविंद्र यांनी  मिलिट्री जॉईन केली होती. समस्त मेढा पंचक्रोशी त्यांच्या पाथीॅवाच्या प्रतिक्षेत असून उद्या रविवारी रात्री उशीरा त्यांचे पार्थीव गावात आणले जाईल अशी माहिती  सैन्यदलाच्या वतीने देण्यात आली.