Breaking News

पारायण मंडपात परवानगी शिवाय गणेशमुर्तीची प्रतिष्ठिापनेस विरोध

खटाव, दि. 24 (प्रतिनिधी) : खटाव येथील ज्ञानेश्‍वर संप्रदाय मंडळाच्या परवानगीशिवाय पारायण मंडपात गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करता येणार नाही. येथील जनक्रांती  मंडळाच्या सभासदांनी पारायण मंडपात गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करु न दिल्यास निवेदनाद्वारे आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ज्ञानेश्‍वर संप्रदाय  मंडळाने पुसेगाव पोलीस ठाण्यात अर्ज दिला आहे. मंडळाने अर्जात नमूद केले आहे की, वडूज दिवाणी न्यायालयाने आम्ही दाखल केलेल्या दाव्याचा निकाल  02/05/14 रोजी दिला आहे. त्यानुसार पोलिसांनी आमच्या मिळकतीमध्ये आमच्या परवानगीशिवाय कोणालाही सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची परवानगी देवू  नये. मंडळाच्या उपरोक्ष अशी परवानगी दिली तर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ठरणार आहे. आम्हाला पुन्हा याबाबत कोर्टात दाद मागावी लागेल, असेही  निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती पुसेगाव पोलीस, पोलीस अधीक्षक आणि पोलीस महासंचालकांना देण्यात आल्या आहेत.