Breaking News

गणेशमूर्तींनी बाजारपेठ फुलली! शाडू मातीच्या मूर्त्यांना पसंती

संगमनेऱ, दि. 24, ऑगस्ट - अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी संगमनेरची बाजारपेठ फुलली आहे. गणेश मूर्ती आणि बाप्पाच्या  प्रतिष्ठापनेसाठी लागण्यार्‍या सजावटीच्या वस्तुंनी बाजारपेठेतील दुकाने भरून गेली आहेत. शहरातील बाजारपेठ, कुंभारगल्ली, नवीन नगर रोड, मार्केटयार्ड, बसस्थानक  परिसरात गणेश मूर्तीची दुकाने थाटण्यात आली आहेत. पावसाच्या आगमनामुळे  काहीशा उशिरा थाटलेल्या दुकानांवर प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे. ग्राहकांचा  कल मात्र शाडू मातीच्या गणेशमूर्तींकडे जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर लाडक्या गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी लागणारी वेगवेगळी साहित्य त्यात रंगेबेरंगी  दिपमाळ, गणेश आसन, हार, तोरणे, फळे, फुले, सुंगंधी धूप आदींची दुकाने बाजारपेठेत सजली आहेत. दरवर्षी मूर्तीकार काहीतरी नावीन्यपूर्ण मूर्ती बनविण्याच्या  प्रयत्नात असतात. तसेच याहीवर्षी काही खास मूर्ती बघावयास मिळाल्या. बाहुबलीच्या रूपातील गणपतीची मूर्ती ग्राहकांना आकर्षित करत आहे.