Breaking News

भानसहिवरेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत!

पुण्याच्या दिशा परिवाराचा पुढाकार

नेवासा़, दि. 24, ऑगस्ट - पुण्यातील सदाशिव पेठेतील दिशा परिवार या सेवाभावी संस्थेकडून नेवासे तालुक्यातील गरीब, गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक  मदत देण्यात आली. नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील विद्यार्थ्यांना प्रथमतःच ही मदत मिळाली. यामध्ये कु. श्रृती पेहरकर एफ. वाय. बी. एस्सी, कु. जान्हवी  पेहरकर 11 वी सायन्स, श्रेयस फुलारी 11 वी सायन्स अनिकेत फुलारी 11 वी सायन्स यांना प्रत्येकी 10 ते 15 हजार रुपयांची शैक्षणिक मदत मिळाली.
पुण्यतील आण्णाभाऊ साठे सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या शानदार सहळ्यात 450 हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना थेट दात्यांच्या हस्ते 1 कोटी 7 लाख रुपयांच्या  धनादेशाचे वाटप विद्यार्थी, पालक,आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ’वंचित विकास’चे विलास चाफेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, पीएमआरडीएचे किरण गीते,  भारत विकास ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, समाजवादी नेते कुमार सप्तर्षि, भाऊसाहेब जाधव, दिपक नागरगोजे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे संचालक राजाभाऊ चव्हाण यांनी सांगितले, की गेल्या 11 वर्षांपासून दिशा परिवार  हा सर्व सामान्यांसाठी सुरु केलेली एक शैक्षणिक संस्था  विद्यार्थ्यांशी माध्यम म्हणुन काम करते. आतापर्यंत दिशा परिवारकडून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना 30 पेक्षा अधिक जिल्ह्यातून 3000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आर्थिक  मदत करण्यात आली. जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर म्हणाले की एडवीन हबलच्या काळात माऊंट विल्सन या 5 हजारफूट उंच डोंगरावर 100 वर्षापूर्वी  वेधशाळा उभारायची होती. व इतक्या उंचीवर खेचराशिवाय (गाढवाशिवाय) शक्य नव्हते. ते काम एडविन हबलने खेचराच्या सहाय्याने पूर्ण केले. वेधशाळा पूर्ण  झाल्यानंतर हबलने तेथे रखवालदार म्हणून काम केले. अशा प्रकारे एक खेचरवाला ते वेधशाळेचा प्रमुख ही कथा सांगत जीवनात कुठलीही गोष्ट जिद्द असेल तर  अशक्य नाही, असे डॉ. नारळीकर यांनी कथेद्वारे विद्यार्थ्यांना सांगीतले. तर पीएमआरडीएचे आयुक्त किरण गिते म्हणाले, की तुम्ही कोठे राहता, गरीब आहात की  श्रीमंत, तुम्ही किती कष्ट केले यापेक्षा तुम्ही किती जिद्दी आहात, हे महत्वाचे आहेे, असा मोलाचा सल्ला दिला.
यावेळी अरुण कुलकर्णी, मोहन भोई, श्रीमती जानोरकर मँडम, महेंद्र खंडेलवाल, अंकुश भोसले, माणिकराव गोते, श्रीमती सुंदरताई साळुंके आदीं मान्यवरांसह  महाराष्ट्रातुन पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिशा परिवारचे संस्थापक राजाभाऊ चव्हाण यांनी केले तर पत्रकार अशोक  पेहरकर यांनी आभार मानले.