Breaking News

मेक इन इंडिया च्या माध्यमातून नेपाळमधील उत्पादन क्षेत्राला मदतच होईल - पंतप्रधान देउबा

नवी दिल्ली, दि, 25, ऑगस्ट - मेक इन इंडिया च्या माध्यमातून नेपाळमधील उत्पादन क्षेत्र आणखी विकसित करण्याबरोबरच रोजगार निर्मितीलाही मदत होईल,  असा विश्‍वास नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा यांनी येथे व्यक्त केला. देउबा सध्या चार दिवसांच्या भारत दौ-यावर आहेत.
20 वर्षांपूर्वीच्या तुलनेत नेपाळमधील उत्पादन क्षमतेत घसरण झाली आहे. नेपाळने 1990 मध्ये गाठलेली उंची पुन्हा गाठण्यासाठी ॠमेक इन इंडिया’ अभियानातून  मदतच होईल. रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी अनेक नेपाळी तरुण विदेशात स्थलांतरित झाले आहेत, असेही देउबा यांनी म्हटले आहे.
भारताबरोबर उद्योग क्षेत्रात भागीदारी करण्यातून नेपाळला फायदाच होईल, याबाबत आम्ही आशावादी आहोत. भारत व चीन जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून पुढे  येत असताना पर्यटक, व्यापारी व गुंतवणूकदारांसाठी नेपाळ हे एक आकर्षण बनू शकते, असेही देउबा म्हणाले.