Breaking News

पाच विमानतळांवर तिकिट आरक्षणाबरोबरच कॅब आरक्षणाची सुविधा

नवी दिल्ली, दि, 25, ऑगस्ट - विमान प्रवासासाठी तिकिट आरक्षित करतानाच विमानतळावर असलेल्या कि ऑस्क च्या माध्यमातून ओला, उबर या टॅक्सी सेवाही  आरक्षित करता येणार आहेत. या संदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरण ने ओला , उबर यांसारख्या कॅब कंपन्यांबरोबर करार केला आहे. यानुसार पुणे (महाराष्ट्र),  चेन्नई, कोलकाता, लखनौ व भुवनेश्‍वर या विमानतळांवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
विमानतळ प्राधिकरणाकडून नेहमीच प्रवाशांच्या सुविधा केंद्रस्थानी ठेवल्या आहेत. विमानतळांवर प्रवाशांना शक्य तेवढ्या चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध  आहोत. ओला व उबर यांसारख्या कॅब कंपन्यांबरोबर करार करून प्रवाशांना कमीतकमी त्रास व चांगल्या सेवा देण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, असे  विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुप्रसाद महापात्रा यांनी सांगितले.