Breaking News

लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित यांना 15 दिवसांची सुट्टी मंजूर

मुंबई, दि, 25, ऑगस्ट - मालेगाव स्फोटातील आरोपी व लष्करातील निलंबित अधिकारी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना लष्कराकडून 15 दिवसांची सुट्टी  मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती पुरोहित यांचे वकील श्रीकांत शिवदे यांनी दिली.
पुरोहित यांना जामीन मंजूर झाल्यानंतर बुधवारी नऊ वर्षांनंतर ते तळोजा कारागृहातून बाहेर आले. यानंतर ते त्वरित कुलाबा येथील लष्करी कार्यालयात हजर झाले  आणि तेथे आवश्यक त्या कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण केल्या. या पुढे पुरोहित यांनी 15 दिवसांची सुट्टी मिळावी, यासाठी वरिष्ठ अधिका-यांकडे रितसर अर्ज केला. या  अर्जाला लष्कराकडून मंजूरी देण्यात आली. या मंजूरीनंतर ते पुण्याला जाणार असल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांकडून समजते.