Breaking News

खासदार उदयनराजे भोसले यांना दिलासा, जामीन कायम

सातारा, दि. 03, ऑगस्ट - खासदार उदयनराजे भोसले यांचा जामीन न्यायालयाने काय केलाय. त्यामुळे उदयनराजे यांना मोठा दिलासा मिळाला. खंडणीसाठी  खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात उदयनराजे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सातार्‍यात मोठा तणाव वाढला होता. लोक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे  कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न होता.  हा विचार करुन सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. तसेच त्यांना एकदिवसाआड पोलीस स्टेशनमध्ये हजेरी  लावण्याचे न्यायालयाने जामीन मंजूर करताना स्पष्ट केले होते.
खासदार उदयनराजे भोसले यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीर वाय. एच. अमेटा यांनी काल कायम केला. लोणंद औद्योगिक वसाहतीमधील सोना अलायज  कंपनीच्या मालकाला खंडणीसाठी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भोसले यांच्यावर मार्च महिन्यात गुन्हा दाखल झाला होता.