Breaking News

गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍या वाहनांना टोलमाफी!

मुंबई, दि. 03, ऑगस्ट - कोकणात जाणार्‍या गणेश भक्तांना यंदाही बाप्पा पावला आहे. कारण मुंबईहून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या भक्तांना 22, 23, 24  ऑगस्टला टोलमाफी मिळणार आहे. आज झालेल्या बैठकीनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी  ही माहिती दिली.
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही कोकणात जाणार्‍या गणेश भक्तांच्या छोट्या चारचाकी गाड्यांना टोलमुक्ती देण्यात आली आहे. यासाठी आज एक विशेष बैठक बोलवण्यात  आली होती. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी कोकणात जाणार्‍या वाहनांना टोलमधून सूट मिळावी यासाठी वाहतूक पोलीस आणि आरटीओ  कार्यालयातून विशेष पास देण्यात आले होते. गणेशोत्सवात कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी जात असतात. त्यामुळे टोलमाफीचा या निर्णयाने त्यांना मोठा  दिलासा मिळाला आहे.