Breaking News

गणेशोत्सवानिमित्त म्हस्केवाडीत अखंड हरिनाम सप्ताह

अळकुटी़, दि. 24, ऑगस्ट - येथील म्हस्केवाडीत गणेशोत्सव आणि मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त ज्ञानेश्‍वरीचे पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन  करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारपासून दि.25 हा कार्यक्रम सुरु होणार आहे. यामध्ये सकाळी काकडा आरती, ज्ञानेश्‍वरी पारायण, भजन, हरिपाठ, किर्तन,  महाप्रसाद, हरिजागर त्याचप्रमाणे हभप बजरंग महाराज आंधळे, हभप एकनाथ महाराज शिंदे, हभप गणेश महाराज घोडेकर, हभप रामचंद्र महाराज दरेकर, हभप  मल्हारी महाराज शेवाळे आदी किर्तनकारांची किर्तनसेवा होणार आहे. या सोहळ्यादरम्यान, हभप विठ्ठल महाराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हरिपाठ होणार आहे. दि.1  सप्टेंबर  रोजी काल्याचे किर्तन होणार आहे. या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन म्हस्केवाडी शिंदेमळा  ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.