Breaking News

स्वच्छता दर्पणमध्ये सातारा झेडपी राज्यात प्रथम

सातारा, दि. 28, ऑगस्ट - सातारा जिल्हा परिषदेने जिल्ह्यात स्वच्छतेमध्ये सातत्य राखल्याने केंद्र शासनाच्या स्वच्छता व पेयजल मंत्रालयाने स्वच्छता दर्पण  अंतर्गत केलेल्या गुणाकंनामध्ये देशात चौथा क्रमांक तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने विविध योजनांमध्ये कायम आघाडी घेतली  असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छता व पेयजल मंत्रालयाच्यावतीने स्वच्छता दर्पण अंतर्गत करण्यात आले होते. त्यामध्ये पंजाबमधील फतेग्रह साहीब या जिल्ह्याने देशात व  राज्यात प्रथम,छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्याने देशात द्वितीय तर राज्यात प्रथम, मिझोरामधील अ‍ॅझवालने देशात तृतीय तर राज्यात प्रथम, सातारा जिल्हा  परिषदेने देशात चौथा क्रमांक तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.पंजाबमधील लुधीयाना जिल्ह्याने देशात पाचवा तर राज्यात दुसरा,सिक्कीमधील साउथ सिक्कीमने  देशात सहावा तर राज्यात प्रथम ,मध्यप्रदेशमधील इंदोरने देशात सातवा तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.