Breaking News

देखावे पाहण्याच्या भाविकांच्या मनसुब्यांवर पावसाने फेरले पाणी

पुणे, दि. 28, ऑगस्ट - शुक्रवारपासून सुरू झालेला मेगा वीकेन्ड, गणरायाचे आगमन अशा अपूर्व उत्साही वातावरणात देखावे पाहण्याच्या भाविकांच्या मनसुब्यांवर  पावसाने पाणी फेरले गेले आहे. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने रविवारीही दिवसभरात थांबून-थांबून हजेरी लावली. त्यामुळे सायंकाळी  देखावे पाहण्याचा मोह पुणेकरांना आवरता घ्यावा लागला. 
गणरायाच्या आगमानबरोबर राज्यात दाखल झालेल्या पावसाचा मुक्काम आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. येत्या 48 तासांत कोकण आणि मराठवाड्याच्या काही  भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे.
गणरायाच्या आगमनाबरोबर राज्यात वरुण राजाने ही हजेरी लावली आहे. ज्या भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती त्याच मराठवाडा आणि विदर्भात  सध्या मुसळधार पाऊस पडत आहे.राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय झाला असून ही परिस्थिती आणखी दोन दिवस राहणार आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण  झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. गेले दोन दिवसापासून राज्यात सर्वत्र चांगला  पाऊस पडत आहे.विशेष करुन कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहेत. त्यामुळे नद्यांना पुर आले आहेत.ऑगस्ट महिन्याच्या  सुरवातील पावसाने ओढ दिल्यानंतर आता शेवटच्या आठवड्यात सर्वत्र हजेरी लावली आहे. विशेषत; मराठवाडा आणि विदर्भातील पिकांना या पावसामुळे जीवनदान  मिळाले आहे.
पुणे शहरात ही गेले दोन दिवसांपासून पावसाच्या थांबून थांबून सरी कोसळत आहेत. रविवार देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडणार्‍या नागरिकांची या पावसामुळे  चांगलीच पंचाईत झाली. अनेकांनी घरी बसून राहणेच पसंत केले. या पावसामुळे कार्यकर्त्यांना ही देखावे पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.