’ओबीसी’साठींची ’क्रिमी लेअर’ ची मर्यादा आठ लाख
नवी दिल्ली, दि. 24, ऑगस्ट - इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या (ओबीसी) आरक्षणासाठी सधन वर्गासाठीची मर्यादा 6 लाखावरून 8 लाख रु . करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या बाबतच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे .या निर्णयामुळे यापूढे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील 8 लाख उत्पन्न असलेले सधन वर्गात येतील असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज येथे सांगितले. या निर्णयामुळे ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षणाचा फायदा मिळेल.
इतर मागासवर्गीय प्रवर्गाची उपसूची तयार करण्यासाठी एक आयोग स्थापन करण्यासाठीची शिफारस राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. यामध्ये या लाभापासून वंचित राहणार्यांचाही समावेश केला जाईल, असे ते म्हणाले. गरजू व समाजातील शेवटच्या घटकांना फायदा व्हावा यासाठी सधन वर्गाची परिभाषा नव्याने करण्याची केंद्र सरकारची इच्छा आहे.