खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी केजरीवालांविरोधात कारवाईची जेटलींची मागणी
नवी दिल्ली, दि. 24, ऑगस्ट - खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात कारवाईची मागणी करणारी याचिका केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर न्यायालयाने केजरीवाल यांना नोटीस जारी करून उत्तर मागितले आहे.
न्यायमूर्ती मनमोहन यांनी याबाबत केजरीवाल यांना चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे. याबाबतची पुढील सुनावणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे. आक्षेपार्ह वक्तव्य व खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी केजरीवाल यांच्याविरोधीत तक्रार दाखल करण्याची अनुमती देण्यात यावी, अशी मागणी जेटली यांच्या वतीने वरिष्ठ विधिज्ञ राजीव नायर व संदीप सेठी यांनी न्यायालयासमोर केली.