Breaking News

जागतिक बॅडमिंटन ; सब्रीनावर विजय मिळवत सायनाची आगेकूच

ग्लासगो, दि. 24, ऑगस्ट - जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत 12व्या मानांकित भारताच्या सायना नेहवालने स्वित्झर्लंडच्या सब्रीना जॅके हिचा 21-11,  21-12 असा पराभव करत तिस-या फेरीत प्रवेश केला. दोन्ही गेम सायनाने अतिशय सहजपणे जिंकले. स्पर्धेतील पहिल्या फेरीत सायनाला पुढे-चाल मिळाली  होती. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिचा खेळ पाहता आला नव्हता. तिस-या फेरीत भारताची तन्वी लाड विरूद्ध द्वितीय मानांकित सुंग जी ह्यून या सामन्यातील  विजेत्या बॅडमिंटनपटूशी सायना झुंजणार आहे.