Breaking News

चुरशीच्या लढतीत साईप्रणीत विजयी; उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक

ग्लासगो, दि. 24, ऑगस्ट - जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या लढतीत 15व्या मानांकित भारताच्या साईप्रणीतने उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक  मारली. साईप्रणीतने इंडोनेशियाच्या अँथनी सीनीसुका गिन्टींग याच्यावर 14-21, 21-18, 21-19 असा विजय मिळवला. पहिला गेम गिन्टींगने सहज जिंकला.  पण त्यानंतर साईप्रणीतने दमदार पुनरागमन करत दुसरा गेम अत्यंत कमी फरकाने जिंकला. सामन्यातील बरोबरीमुळे सामना अधिक रंगतदार झाला. तिसरा  गेमदेखील चुरशीचा झाला. पण मोक्याच्या वेळी गुण कमावून केवळ 2 गुणांच्या फरकाने साईप्रणीतने सामना जिंकला.