Breaking News

सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ फुलली

संगमनेरात गणरायाच्या आगमनाची जय्यद तयारी... स्टेज उभारणीला वेग

संगमनेर, दि. 24, ऑगस्ट - सर्वांच्या लाडक्या गणरायाचे शुक्रवारी उत्साहात आगमन होणार आहे. त्यामुळे आकर्षक गणरायाच्या मुर्ती बाजारात विक्रीसाठी दाखल  झाल्या आहेत. तसेच गणरायाच्या सजावटीसाठी लागणार्‍या साहित्याची दुकानेही शहरात थाटली आहे. तसेच शहर व तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक मंडळाच्या  स्टेज उभारणीच्या तयारीला सध्या वेग आला आहे.
संगमनेर शहर व तालुक्यातील गणेशोत्सवाच्या आगमनास अवघे दोन दिवस बाकी असल्याने आता तरूणवर्गामध्ये वेग आला आहे. तसेच ग्रामीण भागासह शहरातील  नागरीकांनी गणरायाच्या प्रतिष्ठानेसाठी लागणारे साहित्य गणेशाच्या सजावटीस लागणार्‍या आकर्षक मखरे, सिंहसने, फुलांच्या माळा, मोत्यांची मखरे, माळांनी  बाजारपेठा झगमगू लागल्या आहेत.
गणरायाच्या सजावटीसाठी लागणारे थर्माकॉलची आकर्षक मखर, खांब, जाळी, फुलांच्या माळा, मण्याच्या माळा, क्रेप रोल, झगमग लाईटच्या माळा अशा अनेक  अकर्षक साहित्याने संगमनेरची बाजारपेठ फुलली आहे.
निसर्गप्रेमींसाठी खास इको फ्रेंडली आकर्षक मखरे, सिंहसने, फुलांच्या माळा, मोत्याच्या माळा, नक्षीदार आरास यामुळे पर्यावरणपुरक सजावटीसाठई या वस्तुंना मोठी  मागणी होत आहे. क्रेंप बॉल, ख्रिस्टल बॉल, ख्रिस्टल रिबनसह सॅटीन फ्लॉवरच्या माळांनी तसेच वेलवेटनी सजलेली इको फ्रेंडली मखर, वेलवेटची फुले, रुमाल,  बाप्पाची मट्टी, टोप्या, भगवे झेंडे अशा अनेक वसल्तु बाजारात दाखल झाल्या आहेत. तसेच विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी अष्टगंध, उदबत्तीपासून हजारो रुपयांच्या  सजावटीसह अनेक वस्तु साहित्याने बाजारपेठा सजल्या आहेत. तसेच गाण्याची सीडी, कॅसेटस्, गौरी-गणपती गीते, प्लॅस्टीक हार, थर्माकॉलची मखरे, रोषणाईचे  विविध साहित्य प्लॅस्टीक व कागदांची फुलांनी बाजारपेठी सजल्या आहे.
फुलांच्या कमानी, तोरणांची सजावट, आकर्षक पडदे यांनाही मागणी आहे. रुद्राक्षाचे सोनेरी मण्यांचे हार, लाल झेंडे, आणि मोत्यांचे हार आदी प्रकाराचे हार  विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहे. गणरायाच्या आगमणास अवघे दोन दिवस बाकी राहिल्यामुळे सध्या शहरातील विविध उपनगरात व चौकाचौकात तसेच  तालुक्यातील विविध गावांमध्ये विविध गणेशमंडळांच्या स्टेज उभारणीच्या तयारीला सध्या वेग आला आहे. शहरातील मोठ-मोठ्या गणेश मुर्ती, आंदाळच्या  पदाधिकार्‍यांनी आठवड्यापासूनच स्टेज उभारणीस सुरुवात केली होती. त्युळे आता त्यांच्या स्टेज उभारणी अंतिम टप्प्यात आहे.
प्रत्येक मंडळाला वाहतुकीसह अडथळा निर्माण होईल असे स्टेज उभारू नये अशा सूचना पोलीस प्रशासनाने दिलेल्या आहेत आणि काही सूचना व नियांचे पालन  गणेश मंडळांनी केले आहे की नाही हे गणेश उथ्सह सुरु झाल्यानंतरच समजले असे वाटते.
यावर्षी केंद्र सरकारने लागू केलेली जीएसटी करप्रणाली गणेश मुर्तीनाही लागू झालेली आहे. त्यामुळे यावर्षी गणेशमुर्ती खरेदी करतांना सर्वच गणेश भक्तांना  गणेशमुर्तीच्या किंमतीमध्ये 12 टक्क्याने जीएसटी जास्त द्यावला लागणारे आहे. यावर्षी गणेश भक्तांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार असल्याचे चित्र दिसत आहे.