Breaking News

उत्तर प्रदेशमध्ये बनावट नोटांसह तीन अटकेत

सहारनपुर, दि. 3, ऑगस्ट - उत्तर प्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यात पोलिसांनी वाहनांच्या तपासणीदरम्यान 13 लाख 20 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.  याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. इब्राहिम, धन्नू खान उर्फ विक्की आणि अब्दुल फरीद अशी या तिघांची नावे आहेत.
जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. पोलिसांनी मंगळवारपासून वाहनांच्या तपासणीला सुरूवात केली होती. यावेळी संशय  आल्याने पोलिसांनी स्कॉर्पियो गाडीची झडती घेतली असता त्यात बनावट नोटा आढळून आल्या.
मिळालेल्या नोटांमधील 72 नोटा बनावट असून बाकी फक्त रंगीत कागद होते. 60 नोटांचा एक संच तयार करण्यात आला होता. या संचात वर आणि खाली बनावट  नोटा ठेवण्यात आल्या होत्या. बाकी सर्व रंगीत कागद ठेवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.