Breaking News

61 वर्षाच्या अवलियाने सायकलवर पूर्ण केली अमरनाथ यात्रा

नाशिक, दि. 3, ऑगस्ट - वय अवघे 61 वर्षे असलेल्या दीपक शिर्केआपली अमरनाथ यात्रा करण्याची इच्छा सायकलवर एकट्यानेच प्रवास करत पूर्ण केली आहे.  आज (दि.2) नाशिक पुण्यभूमीत आगमन झाले असता नाशिक सायकलीसस्टने त्यांचे जोरदार स्वागत केले. नाशिक सायकलीस्टचे सदस्य असलेल्या शिर्के यांनी  संपूर्ण 4000 किमीचे अंतर त्यांनी सध्या सायकलवर पूर्ण केले हे विशेष. निवृत्त बँकर असलेल्या शिर्के यांनी आपल्या अप्रतिम सामर्थ्यबाबत एक आदर्शच तरुण  सायकलिस्टसमोर ठेवला आहे.
शिर्के यांच्या जंगी स्वागतावेळी नगरसेवक अरुण पवार, शांताराम रायते, नाशिक सायकलीस्टचे शैलेश राजहंस, योगेश शिंदे, नाना गायकवाड, रत्नाकर आहेर, संदीप  जाधव, मुकेश चव्हाणके, डॉ. नितीन रौदळ, डॉ. मनीषा रौदळ, दत्तू आंधळे, मिलिंद देशपांडे, रवींद्र दुसाने आदी उपस्थित होते.
13 जून रोजी संकष्टीीला काळारामाचे दर्शन घेऊन ते या यात्रेसाठी रवाना झाले होते. जाताना त्यांनी इंदूर, ओमकारेश्‍वर, शिवपूर, ग्वाल्हेर, आग्रा, दिल्ली, जम्मू या  मार्गाने प्रवास केला. तर परतीचा प्रवास त्यांनी अमृतसर मार्गे गंगानगर, बिकानेर, जयपूर, अहमदाबाद, बडोदा, सापुतारा आणि नाशिक असा पूर्ण केला. जम्मू येथे  सायकल ठेवत त्यांनी बाबा अमरनाथ मंदिरासह वैष्णोदेवी मंदिर आदी स्थळांना भेट दिली.
आजपर्यंत अनेकांनी मरिप , पुणे पासून जम्मू पर्यंतचे अंतर सायकलवर केले असेल मात्र परतीचा प्रवासही सायकलवर पूर्ण करणारे शिर्के हे एकमेव सायकलीस्ट  असावेत असे नाशिक सायकलीस्टचे शैलेश राजहंस म्हणाले.
रोज सरासरी 70 ते 80 किमीचा प्रवास करत शिर्के 10 जुलै रोजी जम्मू येथे पोचले. संपूर्ण एक आठवडा ते जम्मू काश्मीरमध्ये होते. जम्मू काश्मीर मधील सध्याचे  तणावपूर्ण वातावरण बघता मोठ्या हिमतीने त्यांनी दिल्ली जम्मू या महामार्ग क्रमांक 1 वरून सायकलवर प्रवास केला.
या सायकल प्रवासाबाबत बोलताना शिर्के म्हणाले की, हा संपूर्ण प्रवास हा विस्मयकारक असाच वाटत आहे. आकाल्पितात कल्पित असते असे म्हणतात असेच  काहीसे मी अनुभवले आहे. प्रवासात असताना मित्र, सहकारी, नाशिक सायकलीस्टचे सदस्य, आत्ता आपल्यात नसलेले जसपाल सिंगजी हे सतत संपर्कात होते.