संतप्त नागरिकाने लगावली अतिरिक्त आयुक्तांच्या श्रीमुखात
नाल्यात पडून एकाचा मृत्यूप्रकरणी नागरिकांचा संताप
औरंगाबाद : शहरातील नाल्यात पडून गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास एका नागरिकाचा मृत्यू झाला. या घटनेची पाहणीसाठी आलेल्या मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या श्रीमुखात एकाने भडकावल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील सीडको एन 6, बजरंग चौक येथील राजपूत रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या नाल्यामध्ये पडून एका नागरिकाचा गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. शहरातली ही दुसरी घटना आहे. या घटनेची पाहणी करण्यासाठी सकाळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग आले होते. त्यावेळी पीपल व्हाईस या संघटनेचे रवी गायकवाड यांनी भालसिंग यांच्या श्रीमुखात भडकावली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाल्याने नागरिकांचा मनपा विषयी चांगलाच रोष पाहावयास मिळाला. हा प्रकार घडला तेव्हा या वॉर्डाचे भाजपचे नगरसेवक शिवाजी दांडगे, शिवसेना गटनेता मकरंद कुलकर्णी हेही यावेळी उपस्थित होते. तब्बल 2 तास येथील नागरिक अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग तसेच मनपाच्या अधिकार्यांशी वाद घालत होते. आमदार अतुल सावे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मनपाच्या अधिकार्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.