Breaking News

उ.प्र. विधानसभेत सापडलेल्या पावडर प्रकरणी चुकीचा अहवाल; अधिका-याच्या निलंबनाची शिफारस

लखनौ, दि. 3, ऑगस्ट - उत्तर प्रदेश विधानसभेत सापडलेली ॠपीईटीएन’ नामक पावडर स्फोटक पदार्थ असल्याचा अहवाल देणारे राज्य न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे  (फॉरेन्सिक स्टेट लॅब) संचालक श्याम बिहारी उपाध्याय यांना निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक सुलखान सिंग यांनी गृह  विभागाला ही शिफारस केली आहे. यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निर्णय घेणार आहेत.
12 जुलै रोजी विधानसभेत एका आसनाखाली मिळालेली पावडर धोकादायक स्फोटक असल्याचे उपाध्याय यांनी सांगितले होते. प्रकरण गंभीर असल्याने राष्ट्रीय  तपास यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वपूर्ण पावले उचलली. नंतर हा अहवाल चुकीचा असल्याचे समोर आले.  न्यायवैद्यक प्रयोगशाळा राज्य पोलिसांच्या तांत्रिक विभागांतर्गत येते. त्या तांत्रिक पथकाने दिलेल्या अहवालात उपाध्याय यांच्यावर निष्काळजीपणा केल्याचा आरोप  केला आहे.