विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रवादीतर्फे नोटबंदीचे वर्षश्राद्ध
नाशिक, दि. 09, नोव्हेंबर - नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी सर्व परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. ज्या उद्देशाने हा निर्णय घेतला तो उद्देश बाजूला पडून शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे जीवन उध्वस्त झाले आहे. सरकारच्या या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ ॅड. रविंद्र पगार यांनी केला आहे.
नोटबंदीला आज एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे भाजप-शिवसेना युती सरकारच्या नोटबंदी निर्णयाचे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या तहसीलदार कार्यालयांसमोर वर्षश्राद्ध घालून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. नाशिकरोड येथील विभागीय महसुल आयुक्त कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाप्रसंगी अॅड. रविंद्र पगार बोलत होते.
यावेळी विभागीय कार्यालयाच्या गेटवरच पोलिसांनी आंदोलकांना अडविल्याने आंदोलकांनी कार्यालयाचे गेटवरच ठिय्या देत गेट बंद आंदोलन केले. सुमारे 2 तास विभागीय आयुक्त क ार्यालयाचे गेट बंद होते. शेवटी पोलिसांनी अप्पर आयुक्त ज्योतीराव पाटील यांच्यासमवेत आंदोलकांची चर्चा घडवून आणली. त्यानंतर अप्पर आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
भाजप - शिवसेना युती सरकारने नोटबंदी जाहीर करून देशाच्या अर्थव्यवस्थेतील 500 व 1000 रुपयांच्या नोटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी रात्रीच्या वेळी अचानक घोषणा करून चलनातून रद्द केल्या होत्या. परंतु दुर्देवाने एवढा महत्वाचा आर्थिक निर्णय घेण्याअगोदर व त्यानंतर निर्माण होणार्या परिस्थितीची कोणतीही पूर्वतयारी न केल्याने देशभरातील करोडो नागरिकांना प्रचंड आर्थिक ताण तसेच हाल-अपेष्टांना तोंड द्यावे लागले आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी भाजप - शिवसेना युती सरकारने आवश्यक अशा क ोणत्याही उपाययोजना केल्या नव्हत्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक तसेच कष्टकरी, कामगार,सर्वसामान्य जनता व मोलमजुरी करणार्यांना मोठया प्रमाणावर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे.शेतकर्यांनी उत्पन्न काढल्यावर जे काही पैसे येतात ते रोखीत मिळत असतात. त्यामुळे शेतकर्यांकडील पैसा हा काळा पैसा नसतो. सहकारी व जिल्हा बँका तसेच पतसंस्थांवर निर्बंध घातल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग असलेला शेतकरी वर्ग मोठया अडचणीत सापडला आहे. अद्यापही सहकारी बँकेत असलेले पैसे देखील शेतकर्यांना मिळत नाहीत.नोटबंदीच्या सुरुवातीच्या काळात बँकेतून आपले स्वतःचे हक्काचे पैसे काढण्यासाठी देखील तासनतास मोठमोठ्या रांगेत उभे राहून सर्वसामान्य जनता हैराण झाली होती. अनेकांना यात आपले जीव देखील गमवावे लागले होते.