पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होईन - पर्रीकर
पणजी, दि. 24, ऑगस्ट - पणजी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मोठ्या अंतराने विजयी होईन , असा विश्वास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज येथे व्यक्त केला. या निवडणुकीत कोणताही विरोधी पक्षच नाही कारण मला समोर कोणीच विरोधक दिसत नाहीत, असेही पर्रीकर म्हणाले. आज सकाळी मॅसन डे एमोरिम मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पर्रीकर यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाचे 98 टक्के मतदार मतदान करतील. दोन टक्क्यांमागे तांत्रिक अथवा वैद्यकीय कारणे असू शकतात, असेही पर्रीकर म्हणाले.