गोवा पोटनिवडणूक : पणजीत 70, वाळपईत 79.8 टक्के मतदान
पणजी, दि. 24, ऑगस्ट - गोव्यातील दोन मतदारसंघात आज झालेल्या विधानसभा पोटनिवणुकीत पणजीमध्ये 70 टक्के तर वाळपईमध्ये 79.8 मतदान झाले. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पणजीत 77.06 टक्के तर वाळपईत 86.29 टक्के मतदान झाले होते. दरम्यान, काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांना विजयाची खात्री असून मतमोजणी 28 ऑगस्टला होणार आहे. पणजीतून भाजपचे उमेदवार असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दोन्ही जागांवर विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दम्यान, मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे चोख सुरक्षा बंदोबस्तात मतमोजणी केल्या जाणा-या ठिकाणी आणण्यात आली आहेत.