Breaking News

काश्मीरमध्ये सहाय्यक पोलीस उप निरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या

श्रीनगर, दि. 29, ऑगस्ट - काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अब्दुस रशीद यांची आज दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.  रशीद यांच्याजवळ कोणतेही शस्त्र नसल्याने ते दहशतवाद्यांचा प्रतिकार करू शकले नाहीत . 
घटनेनंतर रशीद यांना अनंतनागमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथून त्यांना बादामीबाग कँटमध्ये लष्कराच्या 92 बेस रुग्णालयात हलविण्यात  आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे एका अधिका-याने सांगितले.