Breaking News

दहशतवाद्यांना अर्थपुरवठा : चौघांच्या न्यायालयीन कोठडीत 30 दिवसांची वाढ

श्रीनगर, दि. 29, ऑगस्ट - काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांसाठी अर्थपुरवठा केल्याप्रकरणी अटकेत असलेले हुर्रियत प्रमुख सय्यद अली शाह गिलानी यांच्या  जावयासह चार आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 30 दिवसांची म्हणजे 27 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
पटियाला हाऊस न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश पूनम बांबा यांच्यासमोर सुनावणी झाली. यामध्ये गिलानी यांचे जावई अलताफ अहमद शाह उर्फ फंटुश, राजा  मेहराजुद्दीन कलवाल, मोहम्मद नईम खान व बशीर अहमद भट यांचा समावेश आहे. 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात  आले होते.
या चौघांचे अन्य तीन सहकारी शाहिद कलाम उर्फ शाहिद उल इस्लाम, फारूक अहमद डार, मोहम्मद अकबर उर्फ अयाज यांना 1 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी  सुनावली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने एकूण 7 आरोपींना 24 जुलै रोजी अटक केली होती.