Breaking News

देशभरातील महत्वाच्या शिक्षण संस्था मोडीत काढण्याचा केंद्र सरकारचा डाव; कन्हैयाचा आरोप

औरंगाबाद,दि.8  :- मागील तीन वर्षांपासून देशभरातील महत्वाच्या शिक्षण संस्थाना केंद्र सरकारने टार्गेट केले आहे. त्या मोडीत काढण्याचा डाव आहे शिक्षणव्यवस्था उधवस्त केल्यास गरीब, अल्पसंख्याक ,दलीत समाजातील विद्यार्थी शिकणार नाहीत. या कारस्थानाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तींमध्ये कपात बंद करण्यापासून झाली असून यातुन संघाला फक्‍त देशात मनुवाद आणायचा आहे. यासाठीच शिक्षण संस्थांवर सुनियोजित हल्ले सुरू केले असल्याचा आरोप जेएनयूविदयार्थी संघटनेचा माजी नेता कन्हैया याने केला.
पुराणात कन्हैयाने अर्जूनाच्या रथाचे सारथ्य करत युध्द जिंकण्यात महत्वाचा भूमिका बजावली होती. मात्र हा कलयुगातील कन्हैया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रथ रोखणार असल्याचे कन्हैया त्याने म्हटले आहे कन्हैया कुमार लिखित ‘बिहार से तिहार’ या आत्मचरित्राच्या लेखक व कवी डॉ. गणेश विसपुते यांनी मराठी अनुवादाचे प्रकाशन औरंगाबाद शहरातील तापडिया नाट्यगृहात कन्हैया कुमार यांच्या हस्ते पार पडले. तेव्हा त्यांनी उपस्थित श्रोत्यांशी संवाद साधला. डॉ. भालचंद्र कांगो अध्यक्षस्थानी होते.
मोदी सरकारवह प्रत्येक गोष्टीत अपयश आल्याने त्याकडे दुर्लक्ष करत कोणत्याही बाबींचा देशभक्तीसोबत संबंध जोडत जनतेचे लक्ष विचलित करण्याचा कार्यक्रम सुरू असल्याचा आरोप कन्हैयाने केला एकाच ध्येयासाठी लढणा-या विविध चळवळींना एका सूत्रात जोडण्यासाठी आत्मचरित्र लिहिले असल्याचे त्याने एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.