Breaking News

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष झरदारी यांची निर्दोष मुक्तता

इस्लामाबाद, दि. 27, ऑगस्ट - पाकिस्तानच्या भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. झरदारी  यांच्यावर उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. झरदारी यांचे वकिल फारूक एच. नाईक यांनी जरदारी यांची मुक्तता  करण्यासाठी अपील केले होते. या वर निकाल देताना न्या. खालिद महमूद रांझा यांनी झरदारी यांनी दोषमुक्त केले आहे.
झरदारी यांच्याविरुद्ध न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे हे अधिकांश छायाचित्रांच्या स्वरुपात होते. त्यामुळे त्या आधारावर जरदारी यांना शिक्षा देणे योग्य  नाही . तसेच साक्षीदारांच्या साक्षी झरदारी यांना दोषी ठरवण्यासाठी पुरेशा नाहीत असे न्यायालयाने म्हटले आहे.