Breaking News

हरयाणातील परिस्थिती नियंत्रणात, रेल्वे-बस सेवा पूर्ववत होण्याच्या दिशेने

चंडीगड, दि. 27, ऑगस्ट - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिम यांना बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आल्यानंतर हरयाणामध्ये उसळलेला हिंसाचार  आता नियंत्रणात आला आहे. हरयाणाचे पोलीस महासंचालक बी.एस. संधू यांनी सांगितले की, अंबालावरून जाणारी दिल्ली-कटरा रेल्वेसेवा पूर्ववत करण्यात आली  आहे. राज्यातील काही भागात बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
सिरसामधून डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयातून तब्बल तीन हजार ते चार हजार समर्थक माघारी परतत आहेत. 28 ऑगस्टला न्यायालय गुरमीत राम रहिम यांना  शिक्षा सुनावणार आहे . या पार्श्‍वभूमीवर कडेकोट सुंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राम रहिम यांना ठेवण्यात आलेल्या रोहतकमधील सुनारिया तुरूंग परिसरातही कडक  सुरक्ष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या हिंसाचार व जाळपोळ प्रकरणी पंचकूलामधून सहा जणांना, सिरसामधून चार, कैथलमधून 13, भिवानीमधून  तीन, करनालमधून चार, फतेहाबादमधून एक, अंबालामधून दोन व पानीपतमधून एक अशा एकूण 34 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या प्रकरणी 552 जणांना  अटक करण्यात आली आहे.