Breaking News

जम्मू काश्मीर: सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानचे 3 जवान ठार

श्रीनगर, दि. 27, ऑगस्ट - जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबाराला उत्तर देताना केलेल्या भारतीय  सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे 3 जवान ठार झाले . पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबारास भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले, अशी  माहिती सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यांनी दिली.
शुक्रवारी जम्मूमधील आरएस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात के.के.अप्पाराव जखमी झाले होते. त्यांच्यावर काल शस्त्रक्रिया  केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.