Breaking News

अमरनाथ यात्रेसाठी 300 भाविकांची तुकडी रवाना

श्रीनगर, दि. 01, ऑगस्ट - अमरनाथ यात्रेसाठी 300 भाविकांची तुकडी रवाना झाली. जम्मूमधील भगवती नगर येथून रवाना झालेल्या तुकडीमध्ये 236 पुरुष,73  महिला आणि 309 महिलांचा समावेश आहे. पहलगाम आणि बालटालच्या दिशेने यात्रेकरु रवाना झाले आहेत. आतापर्यंत 2लाख 52 हजार भाविकांनी अमरनाथ  यात्रा पूर्ण केली. शनिवारी (29 जुलै) 592 भाविक राजौरी येथून रवाना झाले आहेत. 29 जून रोजी सुरु झालेली यात्रा रक्षाबंधनाच्या दिवशी (7 ऑगस्ट) संपणार  आहे.