Breaking News

उजनीत 50 टक्के; पुण्यातून विसर्ग घटला

टेंभुर्णी, दि. 01, ऑगस्ट - गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील पावसाने विश्रांती घेतली असली तरी दौंड येथून 16 हजार क्युसेक विसर्ग उजनी धरणात येत  आहे. त्यामुळे धरणातील पाण्यात हळूहळू वाढ होत आहे. सोमवारी (दि. 31) रात्री 10 वाजता उजनी धरणात 50 टक्के चलसाठा झाला आहे.तीन दिवसांपूर्वी 31  हजार क्युसेकने पाणी उजनी धरणात येत होते. मात्र, पुणे जिल्ह्यातील पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. भामा आसखेडमधून हजार 396 क्युसेक, खडकवासला  धरणातून 856, आंध्रातून 325, चासकमानमधून 1400, कळमोडी येथून 240, घोडमधून 840 असा 10 हजार 557 क्युसेक विसर्ग उजनी धरणाकडे येत आहे.