Breaking News

खा. संभाजीराजे भोसले यांनी घेतली भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळाची भेट

पुणे, दि. 24, ऑगस्ट - खासदार संभाजीराजे भोसले यांनी आज भाऊ रंगारी गणेशत्सव मंडळाची भेट घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे  126वे वर्ष आहे की 125वे याचा वाद रंगला असताना ही भेट महत्वाची मानली जात आहे. सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक लोकमान्य टिळक की भाऊसाहेब  रंगारी हा वाद कोर्टात गेला आहे या पार्शवभूमीवर खासदार संभाजीराजे भोसले यांनी भाऊ रंगारी मंडळाच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी भोसले  म्हणाले ’ ’खरा इतिहास सर्वांसमोर यायला हवा. ’भाऊ रंगारी’ मंडळाकडे शासकीय पुरावे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करून याबाबत पाठपुरावा करणार  असल्याचे ते म्हणाले. टिळकांच्या भूमिकेवर आक्षेप नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.