Breaking News

गणेशोत्सव काळात शहरातील वाहतुक मार्गात बदल

जळगाव, दि. 24, ऑगस्ट - शहरात 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत श्री. गणेशोत्सव साजरा होत असून या कालावधीत शहरातील विविध सार्वजनिक  गणेशमंडळांतर्फे करण्यात येणारे देखावे व ते पाहण्यासाठी भाविकांची होणारी गर्दी, तसेच स्थापनादिनी व विसर्जन मिरवणूकांसाठी होणारी गर्दी पाहता शहरातील  वाहतुक मार्गात बदल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले आहे.
सुभाष चौक ते रथ चौक, रथ चौक ते बोहरा चौक, रथ चौक ते पांझरापोळ चौक, पिपल्स बँक ते दाणाबाजार चौक ते सुभाष चौक या चारही मार्गावर तसेच सरस्वती  डेअरी ते राजकोटीया ण्ड कंपनी दुकान, मद्रास बेकरी ते देना बँक, युनियन बँक ते दीप फार्मसी मेडीकल, अनिल प्रोव्हिजन ते राठी ट्रेडर्स या मार्गावर सार्वजनिक  गणेशोत्सव मंडळांची आरास पाहण्यासाठी येणार्‍या नागरिकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी शनिवार 26 ऑगस्ट ते मंगळवार 5 सप्टेंबर या कालावधीमध्ये  सायंकाळी 5 ते मध्यरात्री पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
त्याचबरोबर जळगाव शहरातील प्रमुख सार्वजनिक श्री. गणेश विसर्जन मंगळवार 5 सप्टेंबर असल्याने शहरात श्री. गणेश विसर्जन मिरवणूका असल्याने या मिरवणुका  5 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मध्यरात्री पर्यंत ला. ना. चौक, सेशन कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरु चौक, म.न.पा. इमारती समोरील चौक,  जयप्रकाश नारायण चौक, शास्त्री टॉवर चौक, साने गुरुजी चौक, घाणेकर चौक, भिलपूरा चौक, बालाजी मंदिर, रथ चौक, सराफ बाजार, नेताजी सुभाषचंद्र बोस  चौक, बेंडाळे चौक या मार्गाने विसर्जनासाठी मिरवणूकीने जातील. त्यामुळे विसर्जन मिरवणूक मार्ग व मार्गास मिळणारे सर्व उपरस्ते व गल्ल्यांमधून येणार्‍या सर्व  प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवा वगळून) प्रवेश बंद करण्यात आला आहे.
असोदा भादली कडून जळगावकडे येणार्‍या व जाणार्‍या एस. टी. बसेस व इतर सर्व वाहने शुक्रवार 24 ऑगस्ट ते मगळवार 5 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते मध्यरात्री  पावेतो या कालावधीत मोहन टॉकीज-गजानन मालुसरे नगर, जुने जळगाव, लक्ष्मी नगर, कालीका माता मंदिर मार्गे महामार्गावरुन अजिंठा चौक- आकाशवाणी चौक,  नवीन बस स्टॅण्ड या मार्गाचा वापर करतील. असेही श्री. कराळे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.