राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नवीन गवते पोलिसांच्या ताब्यात
नवी मुंबई, दि. 03, ऑगस्ट - दिघा येथील मोरेश्वर अपार्टमेंटचे बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नविन गवते यांना रबाळे एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाशी न्यायालयात शरण आल्यानंतर कोर्टाने नवीन गवतेंना रबाळे एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान याप्रकरणी गुरुवार) होणार सुनावणी होणार आहे.
बेकायदा बांधकामप्रकरणी गवतेंविरुद्ध पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीन अर्जही केला होता. मात्र, कोर्टानं त्यांचा हा अर्ज फेटाळला होता. अखेर आज नवीन गवते न्यायालयात शरण आले. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.