गुगलची ‘आरियो’ अँड्रॉईड ओ ऑपरेटिंग सिस्टीम सुरु
नवी दिल्ली, दि. 22, ऑगस्ट - गुगलकडून ‘अँड्रॉईड ओ’ ही नवी ऑपरेटिंग सिस्टीम सुरु केली गेली आहे. अँड्रॉईडच्या या सिस्टीमला ‘ओरियो’ असे नाव देण्यात आले. गुगलकडून सुरु करण्यात आलेल्या नवी ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये अनेक नव्या सुविधांचा सामावेश करण्यात आला आहे. ‘अँड्रॉईड ओ’ या सिस्टीममध्ये ‘पिक्चर-इन-पिक्चर मोड’ आणि नोटिफिकेशन डॉट अशी वैशिष्ट्ये असणार आहेत. पिक्चर इन पिक्चर मोडद्वारे आयकॉनच्या डिझाईनमध्ये बदल करता येणार असून या मोडमध्ये दोन वापरकर्ते एकाचवेळी एक अॅप वापरू शकतात.
