Breaking News

पूरग्रस्तांना मदतीसाठी 200 पेक्षा अधिक ट्रक पाठविले, रामदेव बाबांचा दावा

नवी दिल्ली, दि. 22, ऑगस्ट - पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी पतंजलीने 200 पेक्षा अधिक ट्रक पाठविल्याचा दावा योगगुरु बाबा रामदेव  यांनी केला. तसेच पतंजली संस्थेची संलग्न असलेले कर्मचारीही मदतकार्य करत आहेत, असेही ते म्हणाले. 
नागरिकांचे प्राण सुरक्षित राहण्यासाठी आणि पर्यावरणाची हानी थांबविण्यासाठी सरकारने काही तरतुदी करणे गरजेचे असल्याचे रामदेव बाबा यांनी म्हटले.  गेल्या काही दिवसांपासून बिहार, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल आणि आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे पुरस्थिती निर्माण झाली. यात  केवळ बिहारमध्येच 304 जणांचा मृत्यू झाला.तर 18 जिल्ह्यातील एक कोटी 38 लाख 50 हजार नागरिकांना या पूराचा फटका बसला. या पूरग्रस्तांना  मदतीसाठी पतंजलीप्रमाणेच अन्य स्वयंसेवी संस्थांनी देखील मदतीचे हात पुढे केल्याचे सांगण्यात येत आहे.