शेष विश्व संघ सप्टेंबरमध्ये पाकिस्तानात टी20 सामने खेळण्यास तयार : पीसीबी
कराची, दि. 22, ऑगस्ट - शेष विश्व संघ सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानात तीन टी20 सामन्यांची मालिका खेळण्यास तयार असून सात विविध देशांचे एकूण 15 खेळाडू या संघात सहभागी होणार आहेत, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून देण्यात आली. पंजाब सरकारने लाहोरमध्ये खेळवण्यात येणा-या या मालिकेसाठी राष्ट्राध्यक्षांना पुरवण्यात येणा-या दर्जाची सुरक्षा संघांलाही पुरवण्याचे मान्य केले आहे, असे मंडळाचे अध्यक्ष नजाम सेठी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. इंग्लंड, न्यूझीलंड, विंडिज, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे या सात देशांचे खेळाडू शेष विश्व संघातून खेळणार आहेत. मात्र, भारताने आपल्या क्रिकेटपटूंना पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान, झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू अँडी फ्लावर हे शेष विश्व संघाचे प्रशिक्षक असून दुबईत या संघाचे सराव सत्र घेण्यात येणार आहे. त्यानंतर 10 सप्टेंबरपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे.
दरम्यान, झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू अँडी फ्लावर हे शेष विश्व संघाचे प्रशिक्षक असून दुबईत या संघाचे सराव सत्र घेण्यात येणार आहे. त्यानंतर 10 सप्टेंबरपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे.