Breaking News

दिल्ली पोटनिवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल कपिल मिश्रा यांच्याकडून केजरीवालांचे अभिनंदन

नवी दिल्ली, दि. 29, ऑगस्ट - दिल्ली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत बवानामध्ये आम आदमी पक्षाचा विजय मिळविल्यामुळे पक्षाचे बंडखोर आमदार कपिल मिश्रा  यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. पक्षाचा विजय झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्ही केलेले घोटाळे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचविण्यास  मी अपयशी ठरलो, परंतु भ्रष्टाचाराविरुद्धची माझी लढाई अशीच सुरु राहिल,असे खोचक ट्वीट मिश्रा यांनी केले आहे. बयाना विधानसभा मतदारसंघातील  पोटनिवडणुकीमध्ये ’’आप’’चे राम चंदर यांनी 24 हजार मतांनी विजय मिळवला आहे.