Breaking News

सेक्स रॅकेट प्रकरणी दिल्लीतील भीमानंद महाराजांना अटक

नवी दिल्ली, दि. 29, ऑगस्ट - सेक्स रॅकेट प्रकरणी आणि फसवणूक केल्याप्रकरणी दिल्लीतील भीमानंद महाराज यांना अटक करण्यात आली. इच्छाधारी संत म्हणून  प्रसिद्ध असलेल्या भीमानंद स्वामी यांना यापूर्वीही अटक करण्यात आली होती. मात्र त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांच्या गुन्हेशाखेने  अमर कॉलनी पोलीस ठाण्यात त्यांची रवानगी केली आहे.
स्वामी भीमानंद 1988मध्ये पंचतारांकित ह़ॉटेलमध्ये काम करत होते. त्यानंतर केवळ12 वर्षामध्ये त्यांनी गैरमार्गाने कोट्यावधी संपत्ती मिळविली. ही संपत्ती  सक्तवसुली संचालनालयाने 2015 मध्ये जप्त केली होती.