Breaking News

ब्रिटनमध्ये झालेल्या भीषण अपघातात 8 भारतीय ठार

नवी दिल्ली, दि. 29, ऑगस्ट - ब्रिटनमध्ये झालेल्या भीषण अपघातात 8 भारतीय नागरिक ठार झाले आहेत. या दुर्घटनेत अन्य 4 जण जखमी झाले आहेत. दक्षिण  इंग्लंडच्या साउथबाउंड एम-1 महामार्गावर दोन ट्रकने एका मिनीबसला धडक दिली. या धडकेत मिनीबसमधील 8 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिलांचा  समावेश आहे. 
या अपघातातील जखमी आणि मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. घटनास्थळावरून दोन्हींही ट्रक चालकांना अटक केली असून त्यांच्याविरूद्ध  गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी दिली. आरोपींना हाई वायकोंब दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मिनीबस चालकाची ओळख पटली असून सिराक जोसफ (52) असे त्यांचे नाव आहे. जोसफ हे केरळचे रहिवासी असून गेल्या 15 वर्षांपासून ते ब्रिटनमध्ये  वास्तव्यास होते.