Breaking News

जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर मुंडन आंदोलन

हिंगोली, दि. 23, ऑगस्ट - शिवसेनेतर्फे जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आज मंगळवारी मुंडन आंदोलन करण्यात आले. जिल्हयात कर्जमाफी  झालेल्या शेतक-यांच्या याद्या प्रसिध्द करण्याच्या मागणीसाठी हे अंदोलन होते.याच मागणीसाठी पुर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोलबजाओ आंदोलन केले  होते. कर्जमाफी करताना येणा-या तांत्रिक अडचणी लवकर सोडवाव्यात, या दया प्रसिध्द कराव्यात या मागणीसाठी आज मोर्चा काढण्यात आला नंतर  जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर मुंडण करण्यात आले. शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर, बाजार समितीचे सचिव रामेश्‍वर शिंदे पाटील केसापूरकर,  नगरसेवक दिनेश चौधरी, राम कदम, कडुजी भवर, दिलीप घुगे, सुभाष बांगर, कळमनुरी पंचायत समितीचे सदस्य अजय सावंत, दिनकर गंगावणे आदीेचा  अंदोलनात सहभाग होता. जिल्हा उपनिबंधक एस. पी. मैत्रेवार यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.