लष्करचा कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय लष्करांकडून सर्वात मोठी कारवाई
श्रीनगर,दि.2 : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी सुरु असलेल्या चकमकीत भारतीय लष्करांनी आपली कामगिरी चोख बजावत, लष्करचा कमांडर अबु दुजानचा खात्मा केला. काश्मीर खोर्यातील पुलवामाच्या हकरीपोरामध्ये मंगळवारी सकाळी भारतीय सैन्याने लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर अबु दुजानला यमसदनी धाडले.
लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर अबु दुजानासह या चकमकीत आणखी दोन अतिरेक्यांनाही यमसदनी धाडण्यात आले आहे. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या अबु दुजानाच्या शोधात भारतीय सैन्य होते. दुजानाला मारण्यासाठी सैन्याने अनेक ऑपरेशनही केले होते. सैन्याने त्याच्यावर 10 लाखांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. सीआरपीएफची 182 बटालियन, 183 बटालियन, 55 राष्ट्रीय रायफल आणि एसओजीच्या पथकाने या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. इथे अबु दुजानासह 2 ते 3 दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यानंतर जवानांनी पहाटे साडेचार वाजताच घराला वेढा दिला. यानंतर दहशतवाद्यांनीही गोळीबार सुरु केला. पण चकमकीनंतर जवानांनी ते घर स्फोटकांनी उडवले. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दलाबरोबरच्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू दुजानासह दोन दहशतवादी ठार झाले. अबू दुजाना याला पकडण्यासाठी 35 लाखाचे इनाम जाहिर करण्यात आले होते. पुलवामा परिसरात अबु दुजानासह दोन दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. यावेळी सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत दुजान ठार झाला. आणखी एका दहशतवाद्याचा शोध सुरू असल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सकाळपासून चकमक सुरू होती.
काश्मीरमध्ये हिंसाचार
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू दुजानासह दोन जणांना ठार करण्यात आल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे.
परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षादलाना गोळीबार करावा लागत आहे. या गोळीबारात एक तरुण जखमी झाला आहे. लष्कराच्या या कारवाईत अबू दुजानीसह इतर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तर अजून एका दहशतवाद्याचा शोध सुरु आहे. या दहशतवाद्याला शोधून काढण्यासाठी काकपुरा गावातील हाकरीपुर परिसराला लष्कराने वेढले आहे.