Breaking News

मुंबई विद्यापीठाचा निकाल 15 ऑगस्टला ?



मुंबई,दि.2 : मुंबई विद्यापीठातील परिक्षांचा निकाल 15 ऑगस्टपर्यंत लागतील.त्यानंतर निकालाची छपाई करण्यात येईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी दिली. मुदत संपून गेल्यानंतरही मुंबई विद्यापीठाचे निकाल न लागल्याने युवासेनेच्या पदाधिकार्‍यांनी कुलगुरूंची भेट घेतली. यावेळी कुलगुरुंनी निकाल पाच ऑगस्ट रोजी लागणार नसल्याची माहिती दिली आहे.या वादाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख बुधवारी माध्यमांशी बोलणार असल्याचे सांगण्यात आले आहे .