Breaking News

राजस्थानी बोकड पहायला गर्दी!

अहमदनगऱ, दि. 24, ऑगस्ट - शहरात कधी, कुठे आणि कशासाठी गर्दी होईल, हे काही सांगता येत नाही. जळगाव जिल्ह्यातून विक्रीसाठी आणले गेलेले  राजस्थानी बोकड पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली. नगर-औरंगाबाद महामार्गालगतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळील मोकळ्या जागेत  काल दि.22 हे बोकड बांधण्यात आले होते. 
पुढील महिन्यात दि.2 येत असलेल्या बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर कुर्बानीसाठी राजस्थानच्या महेंद्रसिंग आणि मोद्रीसिंग या दोघांनी हे बोकड विकायला आणले होते.  यातील एका बोकडाची किंमत चक्क 1 लाख 30 हजार रुपये असल्याचे हे दोघे सांगत आहेत. हे बोकड पंजाबमधून आणले गेल्याचे सांगण्यात आले. या बोकडाचा  वाण, रंग, वजन आणि किंमत याविषयी उपस्थितांमध्ये मोठी कुतूहलपूर्ण चर्चा रंगली होती.